breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीव्यापार

जूनमध्ये सुट्यांचा मुक्काम; या दिवशी बँकांना राहिल ताळे

Bank Holidays In June 2024 : मे महिना संपून आता जून महिना सुरु होईल. या महिन्यात शाळा प्रवेशाची, नवीन वह्या-पुस्तकं, गणवेशाची कोण धांदल उडालेली असेल. तर मान्सून दाखल होत असल्याने शेतकऱ्यांमागे मोठी लगबग असेल. अशातच जून महिन्यातील या दिवशी बँकांना सुट्टी असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षांतील सुट्यांची एक यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँकांना ताळे असेल. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 तारखेला काही राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. त्या भागात बँकांना सुट्टी असेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, जून महिन्यात एकूण 12 दिवस कोणतेही कामकाज होणार नाही. अर्थात प्रत्येक राज्यात इतक्या दिवस बँका बंद असतील असे नाही. त्या-त्या राज्यानुसार त्यात उलटफेर दिसून येतो. या काळात शनिवार-रविवार आणि सण-उत्सवामुळे सुट्यांचे सत्र असेल. राज्यातही काही दिवस बँकांना ताळे दिसेल.

हेही वाचा – पोर्श अपघात प्रकरणात सर्वात मोठी बातमी; अखेर 2 डॉक्टर निलंबित

जून 2024 महिन्यातील बँकांच्या सूट्यांची यादी

1 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानासाठी काही राज्यांत सुट्टी

2 जूनला रविवार आहे. त्यादिवशी सर्वच बँकांना ताळे असेल

8 जून रोजी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँकेचे शटर डाऊन

9 जून रोजी हक्काचा सुट्टीचा दिवस असल्याने बँकेतील कामकाज होणार नाही

16 जून रोजी रविवार, देशभरातील बँका बंद असतील

22 जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना ताळे

26 जूनला रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button